26th Sept, 2023

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी करा हे 10 उपाय

  • Home |
  • Blog |
  • पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी करा हे 10 उपाय

Reviewed By

Dr Dhananjay Chavan

Dermatologist

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी करा हे 10 उपाय | HairMD

केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी, त्यांची योग्य निगा राखणे आवश्यक असते, पण अनेकांना हे माहीत नसते की बदलत्या हवामानाप्रमाणे किंवा बदलणार्‍या ऋतूं प्रमाणे, केसांची वेगवेगळी काळजी घ्यावी लागते, जसेकी, हवेत खूप उष्णता असताना केसांची घ्यावी लागणारी काळजी आणि हिवाळ्यात करावे लागणारे उपाय ह्यात फरक आहे. 

तसेच उन्हाचा केसांवर होणारा परिणाम आणि पावसाच्या पाण्याचा केसांवर व डोक्याच्या त्वचेवर होणारा परिणाम वेगळा आहे आणि म्हणूनच ह्या दोन ऋतूंमध्ये केसांची वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. पावसाळा तुमच्या केसांना काय करतो (how does monsoon affect your hair) आणि पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी (how to take care of hair during monsoon) ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा लेख नक्की वाचा.

What’s covered in the article?

  • पावसाळा तुमच्या केसांना काय करतो? (Effects of Monsoon on Hair)
  • पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे 10 उपाय (10 Monsoon Hair Care Tips and Tricks)
  • Conclusion

पावसाळा तुमच्या केसांना काय करतो? (Effects of Monsoon on Hair)

  • पावसाळ्यामद्धे बर्‍याच लोकांच्या केसांत कोंडा होतो.
  • ह्या ऋतूमध्ये डोक्यावरील त्वचा तेलकट होते व केसांमधील तेलकटपणा वाढतो.
  • अनेकदा पावसाळ्यामद्धे डोक्यावरील त्वचेला खाज सुटते.
  • पावसाळ्यामद्धे काहींचे केस कोरडे होतात, ठिसूळ होतात, व गळतात.
  • हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे केस गळणे, तुटणे व डोक्यावरील त्वचेला खाज सुटणे अशा अनेक समस्या उद्भवतात.

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे 10 उपाय (10 Monsoon Hair Care Tips and Tricks)

  • तुमच्या केसांना व डोक्यावरील त्वचेला पावसाच्या पाण्यामध्ये ओले होण्यापासून वाचवा (Protect your hair from getting drenched in the rain). एकतर केसांना भिजू देऊ नका आणि डोके व केस पावसात भिजलेच, तर ते लगेच पुसून कोरडे करा. केस कोरडे करण्यासाठी शक्यतो microfiber टॉवेल चा वापर करा, जेणेकरून पाणी लवकर टिपले जाईल, व त्वचेला घर्षण कमी झाल्यामुळे केस गळणार नाहीत.

  • पावसाच्या पाण्यात केस भिजले असतील तर ते नुसतेच कोरडे न करता, आधी केसांना स्वच्छ धुवा, जेणेकरून केसांतील माती, धूळ किंवा रासायनिक पदार्थ निघून जातील.

  • ओल्या केसांना कंगव्याने विंचरू नका. पावसाळ्यामद्धे, मोठे दाते असलेल्या कंगव्याचा वापर करा जेणेकरून केसातील गुंता सोडवणे सोपे होईल. कंगवा स्वच्छ ठेवा, तसेच एकमेकांचे कंगवे वापरणे टाळा. ह्यामुळे scalp infections चा धोका कमी होईल. (Use a wide-toothed comb and do not comb wet hair)

  • पावसाळ्यात केस शक्यतो छोटे ठेवा (keep the hair short in the rainy season). ह्यामुळे केस गळणे व ते विंचरताना तुटणे ह्यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत तसेच केसांची काळजी घेणे सोपे होईल.

  • केसांचा कोरडेपणा, ठिसूळपणा व frizz अशा समस्या टाळण्यासाठी व केसांचे गळणे कमी करण्यासाठी तुमच्या केसांसाठी योग्य ठरेल असा शांपू, कंडिशनर व हेयर सीरम वापरा (use a suitable d shampoo, conditioner and hair serum during monsoon). कंडिशनरमुळे केस मऊ राहण्यास मदत होईल तसेच ते तजेलदार दिसतील. सीरम वापरल्याने केसांना खरखरीत होण्यापासून वाचवता येईल.

  • पावसाळ्यात हमखास उद्भवणार्‍या केसांतील कुरळेपण (frizz) ह्या समस्येला दूर करण्यासाठी हेयर मास्क चा वापर करा. शक्यतो hydrating हेयर मास्क वापरा ज्यामुळे केसातील ओलावा टिकून राहील.

  • पावसाळ्यात केस रंगवणे शक्यतो कमी करा. तसेच कोणत्याही हीट स्टाइलिंग उपचारपद्धती काळजीपूर्वकपणे करा (use heat styling instruments carefully and use hair dyes less frequently in monsoon), कारण उष्णतेमुळे केस व डोक्यावरील त्वचा कोरडी पडते व केस गळू शकतात.

  • बाहेर जाताना शक्यतो केस बांधा (Tie your hair when going out in the rains). तुम्ही केसांचा अंबाडा किंवा पोनीटेल बांधू शकता जेणेकरून केसांमध्ये पाणी राहणार नाही व केसांना पावसाचे पाणी तसेच पावसाळी हवामानपासून सुरक्षित ठेवता येईल.

  • पावसाळ्यामद्धे केसांना नारळाचे तेल लावा (oil your hair with coconut oil in monsoon) जेणेकरून केसांना पोषण मिळेल, बळकटी मिळेल व त्या भागातील रक्ताभिसरण वाढल्यामुळे केस तजेलदार व सुंदर दिसू शकतील. तेलामुळे केसांना एक सुरक्षा कवच मिळते ज्यामुळे केसांतील ओलावा टिकून राहतो. पावसाळ्यात केसांना तेल लावावे का? हो, आठवड्यातून दोन वेळा ट तेलाने केस व डोक्यावरील त्वचेला मसाज केल्यास केस चांगले राहण्यास मदत होते व केस तुटणे किंवा गळणे ह्यांसारख्या समस्या कमी होतात, तसेच केसांची चमक टिकून राहते.

  • पावसाळा आला की आपल्याला हमखास तळकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतू मध्ये अशा पदार्थांचे अती सेवन करू नका. (Follow a healthy diet) पावसाळ्यामद्धे प्रथीने व जीवनमूल्ये असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खा, ज्या योगे व पावसाळी हवामानात देखील तुम्ही केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकाल.

Do You Know?

Nearly 250 Patients Visit HairMD

Everyday For Various Hair Concerns?

(You are one click away from flawless skin)

Meet Our Dermatologists

dr-manali-shah-chief-dermatologist-clear-skin-pune
dr-dhanraj-chavan-md-dermatologist-dermato-surgeon-clear-skin-pune
dr-dhananjay-chavan-founder-dermatologist-clear-skin-pune
dr-sachin-pawar-hair-transplant-surgeon-clear-skin-pune
dr-rajeshwari-patil-skin-specialist-dermatologist-clear-skin-pune
dr-dhruv-chavan-plastic-surgeon-clear-skin-pune

Conclusion

पावसाळ्यात केसांची काळाजी कशी घ्यावी व केसांचे सौंदर्य टिकवण्याकरता कोणते उपाय करावेत ह्यावर वैद्यकीय सल्ला घेणे केंव्हाही अधिक हितकारक ठरेल. असे केल्याने तुमच्या केसांच्या पोतानुसार त्यांची कशी व काय वेगळी काळजी घ्यावी ते कळेल व तुम्हाला येणार्‍या केसांच्या समस्यांवर योग्य ते उपचार मिळू शकतील. तुम्ही एखाद्या उत्तम केस व त्वचारोग तज्ञाच्या शोधात असाल, तर HairMD ला आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी dermatologists तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील आणि हे मार्गदरर्शन घेतल्याने तुमचा केसांचे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यासाठीचा मार्ग सुकर होईल. येथील तज्ञांच्या मदतीने तुम्ही सुंदर केस प्राप्त करू शकाल, अगदी नक्कीच.

Further Reading

Do Hats or Helmets Cause Hair Loss?

Discover the truth about Helmets Cause Hair Loss. Learn how improper helmet use & effective tips to maintain healthy hair with HairMD can affect hair health.

Dandruff Fungus Treatment

Learn how dandruff and fungus impact scalp health. With HairMD, you can get expert advice on causes, treatments, and prevention tips to maintain a healthy, flake-free scalp.

Have thoughts? Please let us know

We are committed not only to treating you, but also educating you.