27th Aug, 2024

केस गळणे ही अनेकांची समस्या आहे. वाढते वय, मानसिक ताण, हार्मोन्सचे असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत. केस गळणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे; जूने केस गळतात आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात. परंतू, जेंव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेंव्हा ती एक समस्या होऊन बसते. अशा केस गळतीची परिणती बहुतेक वेळा टक्कल (baldness) पडण्यामध्ये होते, ज्याला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया (androgenetic alopecia) असेही म्हणतात.
जरी इतर वेळी केस गळण्याकडे फारसे लक्षं दिले जात नसले, तरी जेंव्हा त्याचे प्रमाण वाढते, टक्कल दिसू लागते किंवा केस खूपंच पातळ दिसू लागतात, तेंव्हा स्वाभाविकपणे केस गळणे थांबवण्यासाठीचे उपाय शोधले जातात. गळणारे केस सौंदर्यात बाधा आणू लागतात, केस गळणे, पातळ होणे, टक्कल पडणे आशा कारणांमुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग केस गळण्याच्या समस्येवर कोणते घरगुती उपाय (home remedies for hair loss) करता येतील तसेच कुठल्या औषधोपचारांनी (hair loss treatment) केस गळणे थांबवता येईल असे प्रश्न ह्या लोकांना भेडसावत राहतात. ह्या लेखामधे आपण केस गळणे आणि त्यावरील काही रामबाण घरगुती उपाय तसेच इतर उपचार याविषयी माहिती घेणार आहोत.
What’s covered in the article?
- केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Hair Loss)
- केस गळण्यावरील वैद्यकीय उपचार (Medical Treatment for Hair Loss)
- Conclusion
केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Hair Loss)
- नारळाचं तेल (Coconut oil) केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर प्रथिनांची क्षती रोखली जाते तसेच केस मऊ आणि सतेज होण्यास मदत होते. नारळाचे दूध डोक्यावर चोळल्यानेही असेच चांगले परिणाम दिसून येतात.
- केसांना कांद्याचा रस (onion juice) लावला तरी केसांच्या वाढीस मदत होते आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते.
- मेथी (fenugreek) वाटून तिची पाण्यात पेस्ट केली आणि ती केसांना लावली तरी केस गळणे कमी होण्यास मदत होते.
- बीट आणि मेंदी (Beetroot and henna) पावडर ह्यांना एकत्र पाण्यात कालवून, त्यांची पेस्ट केसाला लावल्यास केस गळने कमी होते.
- कोरफड (aloe vera gel) केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात.
- आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस (amla powder, lemon juice) डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना चमक येते.
- रोजमेरीचे तेल (rosemary oil) केसांना लावल्यास केस गळणे कमी होते.
- शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केस गळण्यावरील एक परिणामकारी उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थांचे (iron-rich foods) सेवन करणे.
केस गळणे कमी करण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा राखणे महत्वाचे ठरते. डोक्याला नियमितपणे तेलाचा मसाज करणे, नियमितपणे केस धुणे आणि केसांवर रासायनिक पदार्थांचा वापर कमी करणे ह्या गोष्टी केसांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यास पूरक ठरतात. नियमित व्यायाम आणि योग्य आहार ह्यामुळे हार्मोन्सचे संतुलन राहण्यास मदत होते, ज्यामुळे केस आणि त्वचा ह्यांचे आरोग्य उत्तम राहते.
जर टक्कल पाडण्याचे कारण अनुवंशिक असेल, तर घरगुती उपाय किंवा औषधांचा फारसा परिणाम होत नाही. इतर करणांमुळे उद्भवणार्या केसांच्या समस्यांवर मात्र वर दिलेले घरगुती उपाय नक्कीच चांगला परिणाम साधू शकतात. परंतू केसांचे गळणे जर इतर कोणत्या आजाराममुळे होत असेल, खूप जास्त प्रमाणात होत असेल किंवा घरगुती उपाय करूनही आटोक्यात येत नसेल, तर वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य ठरेल. पुढे पाहूया केस गळणे थांबवण्यासाठीचे काही औषधोपचार
Mesotherapy for hair loss (बालों के झड़ने में Mesotherapy का उपयोग) | HairMD, Pune | (In HINDI)
केस गळण्यावरील वैद्यकीय उपचार (Medical Treatment for Hair Loss)
- मिझोथेरपी (Mesotherapy) हा केस गळण्याच्या समस्येवरील एक उत्तम उपाय आहे, ज्या मध्ये, डोक्यावरील त्वचेला जीवनसत्वांचा पुरवठा केला जातो व तेथील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे, केस गळणे थांबते आणि केसांच्या वाढीस मदत होते.
- रिजेनेरा ऍक्टिवा (Regenera Activa) ही केसा गळणे थांबवण्यावरील एक नवीन उपचार पद्धती आहे, मूलपेशी, वाढीचे घटक (stem cells, growth factors) व progenitor cells डोक्यावरी त्वचेत घातल्या जातात. केसांच्या वाढीसाठी ह्या उपचाराचा चांगला उपयोग होतो.
- प्लेटलेट रिच प्लास्मा थेरपी (Platelet-rich plasma therapy) ह्या वैद्यकीय उपचारामधे रक्तातील प्लेटलेट रिच प्लास्मा काढून घेऊन तो डोक्यावरील टक्कल पाडलेल्या भागावरील त्वचेत घातला जातो, ज्यामुळे केस वाढण्यास आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते.
- नॅनो फॅट ग्राफ्टिंग (Nano fat grafting for hair restoration) ह्या उपचार पद्धतीमध्ये,स्वतःच्या चरबी च्या पेषींवर प्रक्रिया करून त्या डोक्याच्या त्वचेमद्धे घातल्या जातात.
- लो लेवल लेजर लाईट थेरपी (low level laser light therapy) हा देखील केस गळणे कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय ठरतो. अनुवंशिक कारणांनी पडलेले टक्कल देखील ह्या उपायाद्वारे कमी करता येते आणि हा उपचार केल्यास केसांची घनता वाढते.
- मिनोक्सीडील व फिनास्टेराईड (Minoxidil and Finasteride) ही केस गळणे थांबवण्यासाठी ची एफ डी ए (FDA-approved) प्रमाणित औषढे आहेत. ह्यातील कोणते औषध तुम्हाला गुणकारी ठरेल, त्याची मात्रा काय असावी व ते किती काळ घ्यावे हे त्या क्षेत्रातील तज्ञच सांगू शकेल.
- केसांचे प्रत्यारोपण (hair transplant) हा वाढत जाणार्या टाकलावरचा एक उत्तम उपाय ठरू शकतो. ह्या उपचार पद्धतीमध्ये, एका भागावरचे केस काढून, टक्कल पडलेल्या भागावर त्यांचे रोपण केले जाते. केस प्रत्यारोपणाच्या प्रक्रीये मध्ये अतीव वेदना होत असल्याने, त्या थोड्या सुसह्य होण्याच्या दृष्टीने उपाषामकाचा वापर केला जातो.
Do You Know?
Nearly 250 Patients Visit HairMD
Everyday For Various Hair Concerns?
(Your journey to healthier and fuller hair starts here!)
Meet Our Dermatologists
Conclusion
केस गळण्यावरील घरगुती उपाय (hair loss home remedies) तुम्ही स्वमताने केलेत तरी चालतील, पण वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमच्या केसांच्या समस्येनुसार, केसांच्या पोताप्रमाणे, तसेच तुमचे वय, आहार-विहार ह्यांचा व इतर काही व्याधी असल्यात त्यांना विचारात घेऊन, एखादा चांगला केस तज्ञ तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील. केस गळणे, केस पातळ होणे, टक्कल पडणे अशा समस्यांवर तुम्ही उपाय शोधत असाल, तर तुम्हाला फार शोधाशोध करण्याची गरज नाही कारण, HairMD मधील अनुभवी वैद्यकीय तज्ञ (experienced hair specialists) तुम्हाला योग्य ती उपचार पद्धत सुचवतील, त्याबद्दलची पूर्ण माहिती देतील, आणि तुमची केसांची समस्या दूर करतील.
Further Reading
Thyroid Disorders and Hair Loss: Key Symptoms and Treatments
Identify Thyroid symptoms, understand the connection between thyroid health and hair loss & explore treatments to restore hair growth.
Understanding the Impact of Vitamin Deficiencies on Hair Growth
Vitamin deficiencies can cause hair loss. It’s vital to understand how nutrients support hair health.
Everything About Hair Loss in Women: Causes, Remedies, and Prevention
Hair loss can appear as thinning hair, patches, or bald spots. Check out what might be causing it and explore some ways to treat it.
How to Remove Dandruff in One day with Home Remedies?
Dandruff can be frustrating, but you don’t need expensive treatments. Try simple kitchen remedies to naturally eliminate flakes and promote a healthier scalp!
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.