Flat 30% Off On All Skin & Hair Consultations at Pune Station & Baner Clinic till 28th Feb 2025. T&C Apply

17th Nov, 2021

केसांची घनता वाढवण्याचे नैसर्गिक उपाय (How To Increase Hair Thickness? – Best Tips In Marathi)

  • Home |
  • Blog |
  • केसांची घनता वाढवण्याचे नैसर्गिक उपाय (How To Increase Hair Thickness? – Best Tips In Marathi)

Reviewed By

Dr Dhananjay Chavan

Dermatologist

How To Increase Hair Thickness Best Tips In Marathi HairMD Pune

केसांची घनता अनुवंशिक असते तसेच आहारातील पोषणततत्वे व केसांची निगा हयाही गोष्टींशी केसांची जाडी आणि मजबूती निगडीत असते. काहींचे केस मूलता:च जाड असतात तर काहींचे पातळ असतात, पण काहींच्या बाबतीत, केस गळल्यामुळे ते पातळ होतात. ही परिस्थिती अनेक कारणांनी उद्भवू शकते. एखाद्या आजारामुळे केस गळतात व पातळ दिसू लागतात, तसेच एखाद्या औषधाचा अथवा उपचारपद्धतीचाही केसांच्या जाडीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे केस पातळ होतात. काही पोषणातत्वांच्या कमतरतेमुळेही केस पातळ होतात, तसेच केसांची नीट काळजी नं घेतल्यास ते गळू लागतात व पातळ दिसू लागतात.

टक्कल हे बरेचदा अनुवंशिक असते व ते घालवण्याकरिता वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात परंतू इतर कोणत्या कारणामुळे जर केस पातळ झाले असतील तर काही रामबाण घरगुती उपायांच्या साह्याने केसांची जाडी व सौंदर्य परत मिळवता येते. ह्या लेखात आपण बघणार आहोत केसांची जाडी वाढवण्यासाठीचे निसर्गोपचार (natural hair growth tips in marathi) आणि काही सोपे घरगुती उपाय.

What’s covered in the article?

  • Fast Hair Growth Home Remedies and Tips in Marathi
  • Conclusion

Fast Hair Growth Home Remedies and Tips in Marathi

  • केसांना आवळा पावडर व शिकेकाईचा लेप लावल्याने केसांची जाडी वाढते.
  • नारळाचे तेल व आवळा पावडर ह्यांचाही केसांच्या घनतेवर चांगला परिणाम होतो.
  • रोजमेरी आणि लवेंडर (rosemary and lavender oil) या तेलांचा मसाज केसांची जाडी वाढवण्याकरिता (increase hair thickness) उपयुक्त ठरतो.
  • केसांना जोजोबा तेल (jojoba oil) लावल्यास केसांना पोषणमूल्य मिळतात, केस मुलायम राहतात, तसेच त्यांची जाडीही वाढते.
  • नारळाचे तेल केसांची जाडी वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते.
  • लिंबाचा रस केसाला व डोक्याच्या त्वचेला लावल्यास कोंडा (dandruff), कोरडेपणा (dryness) अशा समस्या दूर होतात व केसांचे गळणे कमी होते (reduce hair fall).
E

How to control Hair Fall and Dandruff | (हेयर फॉल डैंड्रफ कैसे नियंत्रित करें)| (In HINDI)

  • अॅपल सिडर विनिगर (apple cider vinegar) चा केसांवर वापर केल्यास त्यांना मजबूती येते, तसेच त्यांची घनता वाढते (increase hair thickness).
  • केसांना एलोवेरा (aloe vera) चा लेप लावल्यास ते मुलायम होतात तसेच त्यांची जाडी वाढते.
  • केस गळण्याचे कारण दूर करूनही केसांची वाढ पूर्ववत करता येते व त्यांची जाडी वाढण्यास मदत होते. जसेकी हार्मोन्स च्या असंतुलनामुळे पातळ झालेले केस, हार्मोन्सचे संतुलन राखल्यास पुन्हा वाढू लागतात. एखाद्या उपचार्पद्धतीमुळे, औषधामुळे किंवा आजारामुळे केस गळत असतील तर ही करणे दूर केल्यास केसांची जाडी वाढू शकते.
  • तुम्हाला तेल लावायचे असल्यास केस धुण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तेल केसांना लावून केस धुतल्यास व शाम्पू व कंडिशनर चा वापर करून योग्य ती स्वछता राखल्यास केस गळणे कमी होते तसेच केसांच्या वाढीस मदत होते.
  • योग्य तो आहार आणि व्यायाम केल्याने जसा तब्येतीवर चांगला परिणाम होतो तसाच केसांवरही होतो. त्यांची तकाकी, मुलायमपणा, मजबूती, घनता आणि सौंदर्य टिकून राहते.
E

Does Aloe Vera Really Help Hair Growth (क्या Aloe Vera बाल बढ़ाने में मदद करता है) | (In HINDI)

वरील घरगुती उपाय (home remedies for hair growth and thickness in marathi) केल्याने केसांची व डोक्याच्या त्वचेची निगा राखली जाते व केसांचे सौंदर्य टिकून राहते. हे घरगुती उपाय करूनही तुमचे केस वाढत नसतील किंवा केस गळण्याचे प्रमाण खूप असेल, ज्यामुळे तुम्हाला टक्कल पडू लागले असेल, तर तज्ञाचा सल्ला घेणेच योग्य ठरेल. असे केल्याने केस पातळ होण्याचे नेमके कारण शोधती येते व त्यावर योग्य तो उपाय करता येतो. तुम्हाला जर केस पातळ होण्याचे समस्या असेल, तर HairMD ह्या पुण्यातील ख्यातनाम हेयर ट्रान्स्प्लाण्ट सेंटर (hair transplant centre) ला आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी डॉक्टर्स तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील व तुम्हाला योग्य ते उपचार देऊन तुमची केस पातळ होण्याची समस्या दूर करतील. तिथे मिळालेल्या उपचारांच्या साह्याने तुमचे केस अधिक सुंदर दिसतील हे नक्की.

Do You Know?

Nearly 250 Patients Visit HairMD

Everyday For Various Hair Concerns?

(You are one click away from flawless skin)

Meet Our Dermatologists

dr-manali-shah-chief-dermatologist-clear-skin-pune
dr-dhanraj-chavan-md-dermatologist-dermato-surgeon-clear-skin-pune
dr-dhananjay-chavan-founder-dermatologist-clear-skin-pune
dr-sachin-pawar-hair-transplant-surgeon-clear-skin-pune
dr-rajeshwari-patil-skin-specialist-dermatologist-clear-skin-pune
dr-dhruv-chavan-plastic-surgeon-clear-skin-pune

Conclusion

केसांची जाडी आणि मजबुती अनुवांशिकता, आहार, आणि केसांची काळजी ह्या गोष्टींवर अवलंबून असते. विविध कारणांनी केस गळण्याची समस्या उद्भवू शकते, पण योग्य घरगुती उपायांनी आणि आहाराने तुम्ही त्यांना पुन्हा मजबूत आणि घनतेने भरलेले बनवू शकता. जर तुम्हाला घरगुती उपायांनी समाधान मिळत नसेल, तर तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. पुण्यातील HairMD हेयर ट्रान्स्प्लाण्ट सेंटरवर जाऊन तुम्ही उत्तम मार्गदर्शन आणि उपचार मिळवू शकता. तुमच्या केसांना पुन्हा सौंदर्य आणि जाडी मिळवण्याची संधी गमावू नका!

Further Reading

Ultimate Food Guide For Healthy Hair

Discover the Food For Healthy Hair. Learn how nutrients like biotin, zinc, and omega-3 fatty acids contribute to hair strength and shine.

Have thoughts? Please let us know

We are committed not only to treating you, but also educating you.