6th March, 2024

उन्हाळ्यात केसांसाठी 10 प्रभावी काळजी टिप्स

  • Home |
  • Blog |
  • उन्हाळ्यात केसांसाठी 10 प्रभावी काळजी टिप्स

Reviewed By

Dr Dhananjay Chavan

Dermatologist

summer hair care tips in Marathi

केसांची काळजी घेणे हे कोणत्याही एका ऋतुपुरते मर्यादित नाही, केसांची निगा रोजंच घ्यावी लागते. परंतू, ऊन, उष्णतेमुळे येणारा घाम, व तापमानाचा त्वचा आणि केसांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे जास्त महत्वाचे ठरते, व त्यांची वेगळी अशी काळजी घ्यावी लागते. 

उन्हामुळे केसांचा रंग आणि पोत बदलतो. घाम आल्यामुळे डोक्यावरील त्वचेला खाज सुटते, त्वचा व केस चिकट होतात, व अशा वेळी केस धुतले गेले नाहीत तर त्यांच्यामध्ये धूळ व वातावरणातील इतर कण साठून राहू शकतात, ज्यांचा केसांवर विपरीत परिणाम होतो. ह्या कारणांमुळे अनेक लोकांना उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडतो. ह्या लेखामद्धे आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे १० उपाय (summer hair care tips).

What’s covered in the article?

  • उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी १० उत्तम उपाय (10 Summer Hair Care Tips in Marathi)
  • Conclusion

उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी १० उत्तम उपाय (10 Summer Hair Care Tips in Marathi)

  • उन्हात बाहेर जाताना केसांना रुमाल अथवा टोपीने झाका, जेणेकरून केसांना उन्हापासून संरक्षण मिळेल (sun protection for hair).
  • उन्हाळ्यात शक्यतो केस छोटे ठेवा (trim your hair in summer). त्यांना सैल पद्धतीने बांधा किंवा सैल अशा केशरचना करा (wear loose hairstyles during summer).
  • ह्या ऋतुमध्ये moisturizing शांपू व कंडिशनरचा वापर करा (use a moisturizing shampoo and conditioner).

10 Summer Hair Care Tips in Marathi - Use moisturizing shampoo

  • ज्या उपकरणांच्या वापरामुळे केसांचे व डोक्यावरील त्वचेचे तापमान वाढते, जसेकी ironing tool, किंवा केस कुरळे करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण/यंत्र (curling iron) किंवा अशी कोणतीही प्रक्रिया ज्यामधे केसांवर उष्णतेचा वापर होतो, जसेकी blow drying अशा गोष्टी करणे टाळा (Avoid heating tools).
  • केस उन्हाळ्यात घामामुळे चिकट होत असतील तर रोज किंवा एकदिवसाआड धुतले तरी चालतील.
  • घामाने किंवा धुतल्यानंतर ओले झालेले केस ओढले गेले तर एकमेकांत गुंततात आणि हमखास तुटतात. म्हणूनच उन्हाळ्यात मोठे दाते असलेला कंगवा वापरा जेणेकरून केस तुटणार नाहीत.
  • शक्यतो तेलाचा वापर टाळावा कारण तेलामुळे डॅन्डरफ चे प्रमाण वाढू शकते. अगदीच तेल लावायचे असल्यास केसांना अंघोळीपूर्वी अर्धा तास तेल लावावे व धुवून टाकावे, या मुळे केसांना कंडिशनिंग इफेक्ट येईल व केस मऊ राहायला मदत होईल.
  • योग्य आहार व भरपूर पाणी पिणे (healthy diet and hydration) खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात, घामावाटे पाणी शरीराबाहेर पडते, त्यामुळे जास्त पाणी पिणे आवश्यक असते, तसेच आहारातूनही पाणी व व्हिटामिन्स योग्य प्रमाणात जाणे तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी, केसांना व त्वचेला नीट ठेवण्यासाठी, योग्य असा संतुलित आहार घ्या व खूप पाणी प्या. पाण्याबरोबरच फळांचे रस, नारळाचे पाणी अशा प्दार्थांचे सेवन केल्यास तुम्ही hydrated राहता ज्यामुळे, केसांना व त्वचेला योग्य ती पोषणतत्वे (nourishment) मिळतात.

Diet

  • केसांना कोरडे करण्यासाठी खरखरीत towel वापरू नका. मऊ towel चा वापर करा. नेहमी हेयर प्रोटेक्टंट स्प्रे (hair protectant spray) चा वापर करा. केसांवर कोणतीही heat-based styling ची प्रकरीया करण्यापूर्वी केस कोरडे आहेत ह्याची खात्री करा.
  • केसाममधील गुंता सोडवण्यासाठी कंगवा वापरण्या च्या ऐवजी bristle brush वापरा.

Do You Know?

Nearly 250 Patients Visit HairMD

Everyday For Various Hair Concerns?

(You are one click away from flawless skin)

Meet Our Dermatologists

dr-manali-shah-chief-dermatologist-clear-skin-pune
dr-dhanraj-chavan-md-dermatologist-dermato-surgeon-clear-skin-pune
dr-dhananjay-chavan-founder-dermatologist-clear-skin-pune
dr-sachin-pawar-hair-transplant-surgeon-clear-skin-pune
dr-rajeshwari-patil-skin-specialist-dermatologist-clear-skin-pune
dr-dhruv-chavan-plastic-surgeon-clear-skin-pune

Conclusion

तर हे होते उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे १० परिणामकारक उपाय (hair care tips at home in marathi). ह्या लेखाद्वारे उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी (summer hair care) हे तुम्हाला कळले असेल, तरीही, तज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले, विशेषत:, जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला केसांच्या काही विशिष्ठ समस्या उद्भवत असतील (hair problems in summer), तर एखाद्या केस व त्वचारोगतज्ञाला नक्की भेटा. उन्हाळ्यात केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी कोणते उपाय करायचे ह्याची योग्य माहिती तुम्हाला त्याच्याकडून मिळेल. केसांच्या समस्या व केसांचे आरोग्य हयाबद्दल तुम्हाला उत्तम मार्गदर्शन हवे असेल, तर पुण्यातील HairMD ला आवश्य भेट द्या. तेथे तुम्हाला अनुभवी केस व त्वचारोगतज्ञांना भेटता येईल, व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला केसांचे सौंदर्य अबाधित ठेवता येईल.

Further Reading

Chronic Headaches Linked to Hair Loss?

Explore the link between chronic headaches and hair loss. Learn about causes, triggers, and effective management strategies from the experts at HairMD.

Can a Short Haircut Reduce Hair Loss?

This article explains the facts about haircuts and hair loss, including tips for hair care and effective ways to deal with hair fall.

Powerful Home Remedies for Itchy Scalp

Discover Home Remedies for Itchy Scalp relief with remedies like aloe vera, tea tree oil, and apple cider vinegar. Get expert tips at HairMD!

Have thoughts? Please let us know

We are committed not only to treating you, but also educating you.