8th Aug, 2022
सर्वसाधारणपणे, वाढत्या वयाबरोबर केस गळणे, टक्कल पडणे अशा समस्या उद्भवतात. बरेचदा टक्कल अनुवंशिक असते. काही जनुकीय घटकांमधील बादलांमुळे देखील टक्कल पडू शकते, तसेच काही आजार किंवा एखादे औषध किंवा उपचार ह्यांचा परिणाम केसांवर होतो. आहारातील पोषकतातवामच्या कमतरतेमुळेही टक्कल पडू शकते. केसांवर अति प्रमाणात केलेला रसायनिक पदार्थांचा वापर हासुद्धा केसांच्या वाढीसाठी अपायकारक ठरतो, ज्यामुळे केस गळू लागतात व टक्कल पडते.
टक्कल पडण्यावरील उपचार हे टक्कल पडण्याचा कारणावर अवलंबून असतात. .केस गळण्यावरील कोणतेही उपचार घेण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. औषधे, आहारातील बदल, तसेच टक्कल ज्या कारणाने पडले आहे त्या कारणावरील उपाय ह्या गोष्टी केसांच्या वाढीसाठी उपयुक्ता ठरतातंच, परंतू टक्कल पडण्यावरील सर्वात परिणामकारक उपचारांमध्ये अग्रगण्य स्थान आहे ते हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच केसांच्या प्रत्यारोपणाला. केसांचे प्रत्यारोपण केल्यास, टक्कल दिसणे खूपसे कमी होते, केसांची वाढ बर्याच अंशी सुधारते व केस पुन्हा पूर्वीसारखे दाट आणि सुंदर दिसू शकतात. ह्या लेखामद्धे आपण टक्कल पडण्यावरील कारणे आणि उपचार (Causes and treatments for hair loss), हेअर ट्रान्सप्लांट चे फायदे (advantages of hair transplant), हेअर ट्रान्सप्लांट कसे करतात (hair transplant procedure) आणि हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च (hair transplant cost) ह्या बाबींविषयी माहिती घेणार आहोत.
What’s covered in the article?
- टक्कल पडणे – कारणे आणि उपचार (Baldness: Causes and Treatments)
- टक्कल पडण्यावरील उपचार (Baldness Treatment) खालील प्रमाणे :
- हेअर ट्रान्सप्लांट- फायदे (Benefits of Hair Transplant Surgery)
- ट्रान्सप्लांट कसे करतात? (How is Hair Transplant Conducted?)
- हेअर ट्रान्सप्लांट खर्च – भारतात केस प्रत्यारोपणाची किंमत (Hair Transplant Cost in India)
- केसांचे प्रत्यारोपणच्यासाठी पुण्यातील तज्ञ डॉक्टर (Expert Doctors to Get a Hair Transplant in Pune)
- Conclusion
टक्कल पडणे – कारणे आणि उपचार (Baldness: Causes and Treatments)
टक्कल पडण्याची काही प्रमुख कारणे (Causes of Baldness) खालील प्रमाणे:
- आनुवंशिकता
- जनुकीय घटकांमधील बदल
- पोषक द्रव्यांची कमतरता
- केसांवर रासायनिक पदार्थांचा वापर
- केसांवर ताण आणणार्या केशरचना वारंवार करणे
- मानसिक तणाव
- एखादा आजार
- एखादी उपचार पद्धत किंवा औषध ज्याचा केसांवर विपरीत परिणाम होतो.
टक्कल पडण्यावरील उपचार (Baldness Treatment) खालील प्रमाणे :
- मिनोक्सीडील आणि फिनास्टेराईड ही औषधे केस गळण्यावर परिणाम करतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात.
- टक्कल जर एखाद्या आजारामुळे असेल किंवा एखाद्या उपचार पद्धतीचा परिणाम असेल, तर तो आजार बरा झाल्यावर अथवा ती उपचारपद्धती थांबवल्यावर केसांची वाढ पूर्ववत होते.
- काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जर टक्कल पडत असेल, तर आहारातून किंवा सप्लिमेंट्स च्या स्वरुपात त्या पोषणमूलयांचे सेवन वाढवल्यास, केसांची वाढ चांगली होते.
- मानसिक तणावामुळे टक्कल पडले असल्यास, मानसिक ताण-तणाव कमी केल्यास केसांची वाढ पूर्ववत होऊ शकते.
- केसांवर ताण आणणार्या केशरचना न केल्यास, केसांवर रासायनिक पदार्थांचा वापर टाळल्यासस, तसेच केसांना उष्णतेपासून संरक्षण दिल्यास व त्यांची योग्य ती निगा राखालयास केसांचे गळणे कमी होते.
- पी.आर.पी, नॅनो-फॅट, आणि हेअर ट्रान्सप्लांट (hair transplant treatment) म्हणजेच केसांचे प्रत्यारोपण हे आहेत टक्कल पडण्यावरील वैद्यकीय उपचार. केस गळण्याची समस्या कायमची घालवायची झाल्यास प्रत्यारोपण हा एक उत्तम उपचार ठरतो.
हेअर ट्रान्सप्लांट- फायदे (Benefits of Hair Transplant Surgery)
- हेअर ट्रान्सप्लांट हा टकलावरील एक कायमस्वरूपी उपाय आहे.
- केसांच्या प्रत्यारोपणानंतर (hair transplant treatment) केस जवळजवळ आधीसारखे दिसू लागतात, ते. सुधारित रूपामुळे, तुमचा कमी झालेला आत्मविश्वास वाढतो.
- केस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया खूप महाग नाही, त्यामुळे तुलनेने कमी खर्चामद्धे बसणारा आणि कायम टिकणारा असा हा उपचार ठरतो.
- ह्या शस्त्रक्रियेच्या आधी वेगळी अशी पूर्वतयारी लागत नाही तसेच हेअर ट्रान्सप्लांट नंतर उगवणार्या केसांची वेगळी अशी काळजी घ्यावी लागत नाही.
- ही शस्त्रक्रिया खूप वेळ चालत नाही. ती केल्यानंतर अगदी थोड्या काळात तुम्हाला तुमची नेहमीची दिनचर्या पुन्हा सुरू करता येते, जसेकी शस्त्रक्रियेनंतर काहीच दिवसात, तुम्ही बाहेर जाऊ शकता व कामावर रुजू होऊ शकता.
- केस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेदरम्यान फार वेदना होत नाहीत.
- बहुतेक वेळा हेअर ट्रान्सप्लांट (hair transplant treatment) यशस्वी होते आणि केसांची वाढ चांगली होते. शस्त्रक्रियेनंतर उगवणारे केस हे अधिक दाट आणि चांगल्या पोताचे असतात.
ट्रान्सप्लांट कसे करतात? (How is Hair Transplant Conducted?)
- हेअर ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया एखादा शल्यविशारद असलेला त्वचा व केशरोग तज्ञच करू शकतो.
- ह्या शस्त्रक्रिये मध्ये डोक्यावरील केस असलेल्या भागावरचे केस-बीजकोश काढून त्यांचे रोपण टक्कल पडलेल्या भागावर केले जाते.
- हे रोपण यशस्वी झाले तर टक्कल असलेल्या भागावर केस उगवू लागतात. त्यांचा पोत आणि जाडी चांगली असते. ज्या भागावरून केस बीजकोश काढले गेले होते, तेथील केसांची वाढ जशी होते, तशीच वाढ आधी टक्कल असलेल्या भागावर होऊ लागते. अशा प्रकारे हेअर ट्रान्सप्लांट च्या साह्याने तुम्ही केसांची वाढ पूर्ववत करू शकता आणि तुमच्या केसांचे सौंदर्य परत मिळवू शकता.
- ही वाढ कायमस्वरूपी असते, म्हणजेच एकदा केलेले केस प्रत्यारोपण, हे अनेक वर्षांसाठीचा टकलावरचा उपाय ठरते.
हेअर ट्रान्सप्लांट खर्च – भारतात केस प्रत्यारोपणाची किंमत (Hair Transplant Cost in India)
- केस प्रत्यारोपणाचा खर्च टकलाचे प्रमाण किती आहे, केस गळण्याची समस्या किती तीव्र आहे आणि त्यानुसार किती ग्राफ्ट्सचे रोपण करावे लागणार आहे, ह्या बाबींवर अवलंबून असते.
केसांचे प्रत्यारोपणच्यासाठी पुण्यातील तज्ञ डॉक्टर (Expert Doctors to Get a Hair Transplant in Pune)
तुम्ही जर केसांचे प्रत्यारोपणच्यासाठी पुण्यातील तज्ञ डॉक्टर शोधत असाल, किंवा भारतात केस प्रत्यारोपण करण्यासाठी अनुभवी तज्ञ आणि सर्वोत्तम सोय कुठे आहे (best hair transplant treatment in India) ते शोधत असाल, तर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. कोणाकडे शस्त्रक्रिया करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल, पण, तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून ते क्लिनिक किती लांब आहे, तिथे मिळणार्या सोयी कोणत्या आहेत, जो तज्ञ तुमच्यावर शस्त्रक्रिया करणार आहे त्याचा अनुभव किती आणि तो किती यशस्वी आहे, ह्या गोष्टींचा विचार करून हेअर ट्रान्सप्लांट कुठे व कोणाकडून करून घ्यायचे हे ठरवणे योग्य आहे.
तुम्हाला केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लांट) करायचे असल्यास पुण्यातील एक उत्तम पर्याय म्हणजे HairMD. त्यांच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट surgeon’s ची एक उत्तम टीम आहे. ते तुम्हाला केस गळणे, टक्कल तसेच केसांच्या कोणत्याही समस्येवर उत्तम मार्गदर्शन करतील. अनेकांना इथले तज्ञ व ह्या हेअर ट्रान्सप्लांट सेंटर मध्ये अससेल्या सोयी सुविधा ह्यांचा फायदा झालेला आहे. HairMD मधील तज्ञांचे मार्गदर्शन आणि येथे मिळणारे उपचार, ह्यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या केसांचे सौंदर्य नक्कीच खुलवता येईल.
Do You Know?
Nearly 250 Patients Visit HairMD
Everyday For Various Hair Concerns?
(You are one click away from flawless skin)
Meet Our Dermatologists
Conclusion
टक्कल पडणे ही समस्या अनेक जणांसाठी चिंता निर्माण करणारी असू शकते, परंतु आजच्या काळातील प्रगत उपचार पद्धतींमुळे यावर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. हेअर ट्रान्सप्लांटमुळे केस पुन्हा दाट आणि सुंदर होतात, ज्यामुळे व्यक्तिमत्वात आत्मविश्वास देखील वाढतो. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाची केसांची स्थिती वेगळी असते. योग्य उपचार आणि निगा घेतल्यास, टक्कल पडल्यावरही तुमचे केस पुन्हा पूर्वीसारखे सुंदर होऊ शकतात, त्यामुळे योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.
Further Reading
Shedding Phase After Hair Transplant
Discover essential medications post-hair transplant like finasteride and minoxidil. Learn tips for care and recovery from HairMD Pune experts.
What medications should be taken after a hair transplant?
Discover essential medications post-hair transplant like finasteride and minoxidil. Learn tips for care and recovery from HairMD Pune experts.
Side Effects of Hair Transplant: Insights from Dermatologist
Discover the side effects of hair transplant surgery, preparation tips, and long-term benefits with insights from Dr. Sachin Pawar at HairMD Pune.
Understanding Hair Transplant Results: Simple Guide for Patients
Explore hair transplant results, recovery phases, regrowth, & post-care tips to achieve natural-looking results. expert advice at HairMD
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.